One Nation One Election SaamTv
Video

One Nation One Election : एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव मंजूर

Breaking Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये वन नेशन वन इलेक्शन निवडणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

Saam Tv

एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये वन नेशन वन इलेक्शन निवडणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला एकमताने मंजुरी देण्यात आली.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश एक निवडणुकीवर भर देत आहेत. आता तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने मंत्रिमंडळात याला मंजुरी दिली आहे. आता राज्यसभा आणि संसदेत हा प्रस्ताव ठेवण्यात येईल. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील महत्वाच्या नेत्यांनी याआधीच वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला सहमती दर्शवली होती. या प्रस्तावात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर पुढे १०० दिवसांनंतर स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजे, अशा सूचना केल्या आहेत. यामुळे देशातील निवडणुका निश्चित कालावधित घेता येईल. सध्या राज्य विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या घेतल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT