Nitesh Rane at Sakal Media Office speaking on Maratha reservation issue Saam Tv
Video

Maratha Reservation: ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण शक्य आहे का? मंत्री नितेश राणेंनी स्पष्टच सांगितलं|VIDEO

Nitesh Rane Statement On Maratha Reservation: महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे शक्य नाही. मात्र स्वतंत्र आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज साम टीव्हीच्या मुख्यकार्यालयाला भेट दिली आणि गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे संपादक डॉ निलेश खरे यांनी स्वागत केले.

यानंतर नितेश राणे यांनी मराठा आरक्षण संदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला न्यायच दिला आहे. 2014 ते 2019 च्या काळात फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी असलेले आरक्षण घालवले. परत आमचे सरकार आले आणि पुन्हा 10 टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे.

आपल्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारचं सरकार आहे. राज्यातील हिंदू लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. पहिले भाषेच्या निमित्त हिंदी मराठी वाद लावून लोकांमध्ये तेढ निर्माण केले.पण त्यातून काही विभाजन झाले नाही. मग आता जातीचा प्रयोग केला जात आहे अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. पुढे ते म्हणाले, संविधानाच्या चौकटीत उभे राहून ओबीसी समाजातून आरक्षण देणे हे शक्य नाही.पण स्वतंत्र आरक्षण ज्यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय न होता आरक्षण देण्याची आमची तयारी सुरु आहे असे नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज? मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारली दांडी

Blood cancer symptoms: भारतातील तरुणांमध्ये वाढतोय 'हा' ब्लड कॅन्सर; गंभीर आजारावर नवी थेरेपी ठरतेय फायदेशीर

Gold- Silver Price: सोनं-चांदीला चकाकी, दर वाढल्यामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ; जळगावच्या सुवर्णनगरीत आजचे भाव किती?

Manoj Jarange : मराठा आंदोलक मुंबईहून गावाकडे परतले अन् पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; १९२ पदांसाठी भरती;अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT