eknath khadse - devendra Fadnavis meet saam tv
Video

Eknath Khadse : फडणवीस भेट अन् भाजप प्रवेशाची चर्चा; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं | VIDEO

Eknath Khadse Dismisses BJP Comeback Speculation : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपमध्ये घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Nandkumar Joshi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण या चर्चांना काहीच अर्थ नाही. देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीत मी फक्त विकासकामांवर चर्चा केली आहे, असंही खडसे यांनी सांगितलं.

महायुतीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावरही एकनाथ खडसे यांनी टिप्पणी केली. मंत्रिपद मिळाल्यानंतर याच जिल्ह्याचंच पालकमंत्रिपद हवंय हा हावरटपणा आहे, अशा शब्दांत खडसे यांनी महाजनांचं नाव न घेता चिमटा काढला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावरही खडसे यांनी भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीनंतर या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक होती. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपयश आलं. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं होतं. त्यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता होती. काही महत्वाचे मुद्दे, सरकारचं अपयश, आगामी काळात विविध समस्यांवरून मोर्चे, आंदोलनांमध्ये सहभागी होणे आदींबाबत या बैठकीत चर्चा झाली, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

SCROLL FOR NEXT