Chhagan Bhujbal addresses the media in Nashik on civic issues, airport plans, and student safety concerns due to rising drug abuse. Saam Tv
Video

Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या प्रश्नावर भुजबळांनी हातच जोडले...VIDEO

Chhagan Bhujbal statement: छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांची बिकट स्थिती, विमानतळ विस्ताराची गरज आणि कॉलेजांमधील ड्रग्सच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.

Omkar Sonawane

नाशिक: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत स्थानिक आणि राज्यस्तरीय विविध मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठाम मतं मांडली. खड्ड्यांच्या तक्रारींपासून ते जिल्हा बँकेच्या कारभारापर्यंत, युनेस्को किल्ल्यांपासून ते कुंभ विमानतळाच्या विस्तारापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं.

नाशिकच्या खड्ड्यांबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, नाशिकमध्ये खड्ड्यांची स्थिती वाईट आहे हे खरं आहे. MIDC भागात दोन वर्षांपासून रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. काही ठिकाणी २ ते ४ फूट खोल खड्डे आहेत. ट्रक खड्ड्यात गेले की पाटे तुटतात. यावर संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे. तसेच द्वारका परिसरातील रस्त्यांचं काम पावसामुळे थांबले होते, आता ते पुन्हा सुरू झालं असल्याची माहिती त्यांनी दिली.

नाशिकचे विमानतळ विस्तार करण्यासंदर्भात HAL शी चर्चा झाली आहे. पहिलं टर्मिनल आपण केलं होतं. आता टर्मिनलचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांकडे यासाठी मागणी केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ड्रग्जप्रश्नीही भुजबळांनी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री यावर कडक भूमिका घेत आहेत. नाशिकमधील कॉलेजांमध्येही ही समस्या आहे. काही गावांमध्ये लोक गुन्हेगारांना भीक घालत नाहीत. परदेशी विद्यार्थीही या गोष्टीत गुंतले असल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांची कारवाई सुरू व्हावी अशी आम्ही वाट पाहत आहोत, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT