Vidhan Bhavan Saam TV
Video

Vidhan Bhavan : विधान भवन राडा प्रकरणात नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले अटकेत | VIDEO

Nitin Deshmukh & Rushikesh Takle : विधान भवन राडा प्रकरणात नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाडांचे तर ऋषीकेश टकले हे पडळकरांचे कार्यकर्ते आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान भवनच्या लॉबीमध्ये झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांनाही नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना पोलिसांनी अटक केली आहे. नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे तर ऋषिकेश टकले हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत.

काल विधान भवन परिसरात आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण झाली होती. अचानक उफाळलेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित दोघांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून राजकीय वर्तुळात या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT