Rushikesh Takle : कट्टर समर्थक की गुन्हेगार? गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता Rishikesh Takle नक्की कोण? | VIDEO

Gopichand Padalakar : विधानभवन परिसरात झालेल्या गोंधळात मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख ऋषिकेश टकले अशी झाली आहे.तो गोपीचंद पडळकर यांचा जवळचा आणि कट्टर समर्थक मानला जातो.

विधानभवन परिसरातील गोंधळात मारहाण करणारा इसम कोण होता, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. हल्ला करणाऱ्याचं नाव ऋषिकेश टकले असून तो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.

ऋषिकेश टकले हा पडळकरांच्या प्रत्येक दौऱ्यात, सभा-मेळ्यांमध्ये दिसणारा, जवळचा कार्यकर्ता मानला जातो. हल्ल्याच्या व्हिडिओतही तो स्पष्टपणे मारहाण करताना दिसतो. त्यामुळे हा प्रकार एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचा भावनावश झालेला प्रकार होता, की हेतुपुरस्सर राजकीय सूड यामागे होता, यावर संशय व्यक्त होत आहे.दुसरीकडे भाजपकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे कट्टर कार्यकर्ता की गुन्हेगार, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात गाजतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com