Nitesh Rane Garba Remark: “Abdul’s Ashish” Statement Sparks Debate 
Video

गरबा खेळायचा असेल तर अब्दुलचा आशिष व्हा! नितेश राणेंचं खळबळजनक विधान

Nitesh Rane on Garba Entry: गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. नवरात्रीतील गरबा कार्यक्रमांमध्ये प्रवेशाच्या निर्बंधांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राणेंची भूमिका समोर आली आहे.

Bharat Jadhav

नवरात्रीत मुस्लिमांना बंदी घालणाची मागणी करणाऱ्या नितेश राणे यांनी आता आणखी एक खळबळजनक विधान केलंय. अब्दुलचा, आशिष व्हायची तयारी असेल तरच गरब्यात नाचायला या. म्हणजे हिंदू धर्म स्वीकारा असा थेट इशाराच राणे यांनी दिलाय. साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत नितेश राणेंनी हे विधान केलंय. सध्या गणेशोत्सव चालू असून प्रत्येकांच्या घरी गणरायाचे आगमन झालंय. राज्यातील जनतेला मत्स व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना राणेंनी गरब्यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. धर्माच्या हिंदू धर्माच्या अनुसार एक वेगळा महत्त्व असलेला तो सण आहे आणि म्हणून आमच्या सणांमध्ये जे हिंदू धर्माला मानणारे आहेत, जे सनातन हिंदू धर्माला मानणारे आहेत. जे मूर्ती पूजा करणारे आहेत. त्याच लोकांना गरब्यात येण्याची परवानगी आहे. आम्ही ईद आणि मोहर्रममध्ये आम्ही शामील होऊ शकतो का? आम्हाला तर ते काफिर मानतात, आम्ही कुठल्याही रमजानच्या वेळी जे काही त्यांचे रोजा सोडण्याच्या हिंदूंना बाजूला बसवतात का? मग ते इस्लाममध्ये अगर अशा काही तरतुदी नाहीयेत तर सनातन हिंदू धर्मामध्ये पण नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या धार्मिक सगळे जे सणासुदी आहेत ते नियमानुसार चालवावेत त्याच्यामध्ये कोणी दुसऱ्यानी व्यत्यय आणू नये. जसे हिंदू आणत नाहीत म्हणून मुसलमानांनी पण आणू नये अस स्पष्ट भूमिका असल्याचं नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: टीव्ही पाहाल तर किडनी गमवाल? लठ्ठपणा, डायबेटीज, ब्लडप्रेशरचाही धोका?

कावळ्याला वाटलं विजय आपलाच! पण शेवटच्या क्षणी गिधाडाने डाव पलटला; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये पाणी चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल,300 जणांना नोटिसा!

शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठी अपडेट! OTS अंतर्गत पहिली यादी जाहीर; 1.69 लाख शेतकऱ्यांना संधी, यादीत तुमचं नाव आहे का?

नागपूरचं नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची मागणी; काँग्रेसचा पाठिंबा, भाजपची सावध भूमिका

SCROLL FOR NEXT