Nitesh Rane News SaamTv
Video

Nitesh Rane : नितेश राणेंच वादग्रस्त वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल

Saam Tv

भाजप आमदार नीतेश राणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. 'मी फक्त हिंदूंशीच व्यवहार करणार अशी शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे', असं त्यांनी म्हंटल आहे. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे मुस्लिमांशी कोणताही व्यवहार न करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

''आपण घर विकतो. कोणताही व्यवहार करतो. पण असा व्यवहार करताना समोरचा व्यक्ती हिंदूच असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. यासंबंधी प्रत्येकाने मी केवळ हिंदूंशीच व्यवहार करेन अशी शपथ घेतली पाहिजे. हे सर्वधर्म समभाव आपण मानायचे नाही'', अशा विधानांचा नीतेश राणे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिमविरोधी विधाने करणाऱ्या महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी जाती - धर्माविरोधात बोलून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT