Vishal Pawar Case  Saam Tv News
Video

Vishal Pawar Case Update | विशाल पवार मृत्यूप्रकरणाला नवं वळण

Saam TV News

Vishal Pawar Mumbai | 27 एप्रिलला रात्री विशाल नाईट ड्युटीसाठी घरातून निघाला. साडे नऊच्या दरम्यान सायन माटुंगा दरम्यान विशाल लोकलच्या दारात उभा राहून फोनवर बोलत होता. पण त्याच्या हातावर कसला तरी फटका बसला आणि त्याच्या हातून फोन खाली पडला. खाली बघतो तर काय, फटका गँगचे लोक त्याचा फोन घेऊन पळून जात होते. पुढे ही ट्रेन स्लो झाली, तेव्हा विशाल गाडीतून खाली उतरला आणि या फटका गँगच्या मागे गेला. पण पुढे पाहतो तर काय फटका गँगचे गर्दुल्ले लोक तिथे उभे होते. विशालने त्यांच्याकडे फोन मागितला, पण फटका गँगने फोन द्यायला नकार दिला. फटका गँगच्या लोकांनी विशालवर हल्ला केला, त्याला मारहाण केली. विशालनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण ते लोक इतके होते की विशालचा निभाव लागला नाही. तेव्हा या गर्दुल्ल्यांपैकी एकाने विशालच्या पाठीत इंजेक्शन खुपसलं. या इंजेक्शनमुळे विशाल बेशुद्ध झाला. नंतर याच गँगच्या काही लोकांनी त्याच्या तोंडात लाल रंगाचं काहीतरी रसायन ओतलं. या औषधांमुळे विशाल 12 तास बेशुद्ध होता. त्याला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण 1 मे ला उपचारादरम्यान विशालचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण आता याला एक वेगळं वळण आलंय. पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी इंजेक्शनमुळे विशालचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT