Neelam Gorhe vs Sushma Andhare saam tv
Video

Neelam Gorhe vs Sushma Andhare : नीलम गोऱ्हेंना अब्रुनुकसानीची नोटीस, सुषमा अंधारेंचा इशारा

Neelam Gorhe vs Sushma Andhare : मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटिशीला उत्तर दिलं नाही तर, पुढची लढाई लढू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Nandkumar Joshi

शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता कायदेशीर संघर्षापर्यंत पोहोचला आहे. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलाखतीच्या सत्रात शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मूळ शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अंधारेंनी अॅड असीम सरोदे यांच्यामार्फत गोऱ्हेंना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा आरोप आणि दावा नीलम गोऱ्हे यांनी केला होता. या वक्तव्यामुळं ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले होते. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन केले होते. आता अंधारेंनी आक्रमक भूमिका घेत गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चार दिवसांत उत्तर न आल्यास पुढची लढाई आम्ही लढणार...
सुषमा अंधारे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - सांगली जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटिस

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT