Sunil Tatkare SaamTv
Video

Sunil Tatkare : पालकमंत्रिपदाच्या वादावर सुनील तटकरेंचं मोठं विधान, पाहा Video

Sunil Tatkare Statement On Guardian Ministerial Position : महायुतीत पालकमंत्रिपदावरून वादंग सुरू असतानाच आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी महायुतीतील पालकमंत्रिपदाबद्दल असलेल्या वादावर महत्वाचं विधान केलं आहे. पालकमंत्रिपदाचा वाद आमच्यासाठी संपला असल्याचं तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. या बैठकीत केवळ संघटनात्मक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

महायुतीमध्ये सत्ता स्थापनेनंतर पहिले मंत्रिपदावरून आणि नंतर पालकमंत्रिपदावरून वाद झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यातही पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी सत्र सुरू झाल्याने या ठिकाणच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे याबद्दल पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता अजित पवार गटाचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी याबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. आज अजित पवार गटाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमच्यासाठी पालकमंत्रिपदाचा विषय संपला आहे. या विषयावर बोलण्याचं आता काही प्रयोजन नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सर्व एकत्र येऊन काम करणार आहोत. आजची बैठक ही संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT