Sharad Pawar SaamTv
Video

Dispute In MVA : कॉंग्रेस - ठाकरे गटा वादात पवारांची मध्यस्थी; घेतला महत्वाचा निर्णय | Video

Sharad Pawar Mediating In Congress - Thackrey Group Dispute : महाविकास आघाडीत जागा वाटपवरून बिघाडी होताना दिसत आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होऊ नये म्हणून स्वत: शरद पवार यांनी यात मध्यस्थी केल्याचं समोर आलं आहे.

Saam Tv

कॉंग्रेस आणि ठाकरे गटाच्या वादात आता शरद पवार मध्यस्थी करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात पवार यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. या वादाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होऊ नये म्हणून शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच उरले आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटातील वाद शुक्रवारी चव्हाट्यावर आलेले दिसले आहे. एकमेकांवरची नाराजी भर पत्रकार परिषदेत बोलून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आता या वादाचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या वादात मध्यस्थी करण्यात आली आहे. स्वत: शरद पवार यांनी ही मध्यस्थी केल्याचं समजत आहे. केवळ जागांच्या वादावरून आघाडीत बिघडी नको म्हणून यासंदर्भात शरद पवार कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलल्याचं समजत आहे. ठाकरे गट आणि कॉंग्रेसमधील वादावर आता पवारच तोडगा काढतील असं बोललं जात आहे. त्याचबरोरब रमेश चेन्नीथला देखील आता थोड्याच वेळात मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार असल्याचं समजत आहे. केवळ नाना पटोले यांच्यासंदर्भात ही नाराजी आहे की एकूणच कॉंग्रेसच्या भूमिकेवर ही नाराजी आहे, हे या भेटीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वादाचा फायदा महायुतीला विधानसभेत होऊ नये यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचं समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT