Surabhi Jayashree Jagdish
शिळी पोळी खाणे योग्य आहे की नाही, याबाबत एका डायटिशियनने आपल्या सोशल मीडिया पेजवर माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत.
डायटिशियन डॉ. शिल्पा अरोरा यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये शिळ्या पोळीबाबत काही खास माहिती शेअर केली आहे. जर तुम्हीही शिळी पोळी खात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे.
डॉ. शिल्पा यांचे म्हणणे आहे की शिळी पोळी आरोग्यासाठी फायदेशीर असते. ही पोळी मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तसंच गट हेल्थ खराब असलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरते. यामुळे वजन कमी करणाऱ्यांनाही मदत होते.
शिळी पोळीत रेजिस्टंट स्टार्च असतं, जे पचनासाठी उपयुक्त असते. हे स्टार्च रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतं. त्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
यामध्ये असलेले रेजिस्टंट स्टार्च प्रीबायोटिकप्रमाणे कार्य करते. यामुळे शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. त्यामुळे ही पोळी गट हेल्थसाठीही लाभदायक ठरते.
शिळ्या पोळीचा सर्वात मोठा फायदा वजन कमी करणाऱ्या लोकांना होतो. ही पोळी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे ओव्हरईटिंग टाळता येते आणि वजन नियंत्रणात राहते.
शिळ्या पोळीसोबत दही आणि हळदीचा लोणचंही सेवन करतात. हे मिश्रणं कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही. यामुळे शरीराला पोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळते.
दोन दिवसांपेक्षा शिळी पोळी लहान मुलांसाठी, गर्भवती महिलांसाठी आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकते. कारण ती बॅक्टेरियाच्या संसर्गाचे कारण ठरू शकते.