Sharad Pawar SaamTv
Video

VIDEO : 'जनता आम्हाला साथ देईल..', शरद पवारांची महायुतीवर टीका

Sharad Pawar News : आंबेगाव मतदारसंघात आज शरद पवार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

Saam Tv

आंबेगाव मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी बारामती येथील गोविंदबागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी देवदत्त निकम यांनी निवडणुकी संदर्भात शरद पवार यांच्याशी संवाद साधला. यानंतर शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ''लोकांमध्ये जागृतीचं, उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. यापूर्वीच्या निवडणुका आपण एका पक्षाच्या नावाने लढवल्या. यावेळची निवडणूक महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे पक्ष एक अलायन्सेस स्थापन करून महाराष्ट्र विकास आघाडी या मार्फत लढवत आहोत. दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेना राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा पक्ष अशी दुसरी शक्ती. दुसऱ्या शक्तीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्राची महाराष्ट्र सरकारची सत्ता त्यांच्या हातात आहे. या सत्तेच्या जोरावर तुम्हाला लोकांना आम्ही एका वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो हा त्यांना विश्वास आहे. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी आपण सर्व राष्ट्रवादीचे लोक एकत्र होतो. महाराष्ट्राच्या जनतेने 53 - 54 जागा दिल्या. दोन वर्षासाठी आपण सरकार ही स्थापन केलं. सत्ता अनेकदा मिळाली पण सत्ता मिळवण्यासाठी तुमची पक्ष फोडणे ही भूमिका योग्य नव्हती. ती भूमिका केली गेली,'' अशी टीका शरद पवार यांनी महायुतीवर केली. तर ज्या मतदारसंघात मविआच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्या मतदारसंघात मार्ग काढला जाईल. जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये मी नाही आमची दुसरी लोकं त्या प्रक्रियेमध्ये आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास राज्यातील दहा ते बारा जागांवर दोन उमेदवार दिले असल्याचा पाहायला मिळत आहे. आज उद्या दोन दिवसांमध्ये या जागांवर सर्व मित्र पक्षातील नेते बसतील आणि तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : खोटी माहिती, व्हिडिओ, बातम्या शेअर करताना सावधान; अन्यथा...

Complaint Against Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...

NEET मध्ये मोठ्या बदलांची तयारी; परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात अन् अटेम्पट होतील मर्यादित

Raver Vidhan Sabha : तृतीयपंथीयाचे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात पहिलं 'पाऊल'; रावेर मतदारसंघातून उमेदवारी

Coconut Water: नारळ पाणी सोबत 'हे' पदार्थ चुकूनही खावू नये?

SCROLL FOR NEXT