Leaders of both NCP factions reportedly met at Ajit Pawar’s Premcourt bungalow in Mumbai amid merger discussions Saam Tv
Video

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

NCP Merger Talks After Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. प्रेमकोर्ट बंगल्यावर झालेल्या कथित बैठकीत सुनील तटकरे उपस्थित होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Omkar Sonawane

Merger Buzz at Ajit Pawar’s Premcourt Bungalow: Was Sunil Tatkare Present?अजित पवार यांचे बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. स्वतः शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत सांगितले होते की जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच आमदार जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा दिला होता. मात्र अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील अजित पवार यांच्या प्रेमकोर्ट या बंगल्यामध्ये या सर्व नेत्यांची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते, अशी माहिती राजकीय वर्तुळातील सूत्रांकडून मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salim khan Health Update: सलमान खानचे वडील सलीम खान यांना झाला ब्रेन हॅमरेज; डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत नसल्याने तरुणाने टॉवरवर चढून केले आंदोलन

Matar Bhat Recipe : फोडणीच्या भाताला द्या हिरवागार तडका, १०-१५ मिनिटांत चटपटीत मटार पुलाव तयार

मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

SCROLL FOR NEXT