अजित पवार यांचा गट पाकीटमारांची टोळी असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विरोधकांविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली असल्याचं यावेळी बघायला मिळालं आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. 'जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वेळा चुकीचे विधान केल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता त्यांनी शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजे. कुणाला काय बोलतो याचा विचार केला पाहिजे', असा सल्ला भुजबळ यांनी आव्हाडांना दिला आहे.
दरम्यान, आज भाऊबीजनिमित्त सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येतील का, असा सवाल भुजबळ यांना विचारला असता, 'थोडीशी तानाताण आहे संध्याकाळपर्यंत ते एकत्र येतील अशी आशा आहे, नाही आज आले तर पुढच्या वर्षी तरी एकत्र आले पाहिजे. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब फुटू देऊ नये तसा विचारा केला पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हंटलं.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.