बारामतीचा दादा कोण याचा निकल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मात्र त्या आधीच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यानंतर मीच वाली असल्याचं विधान बारामतीत केलं आहे. त्यांच्या या विधानाची आता सर्वत्र चर्चा होते आहे. मात्र, त्याचवेळी लोकांनी वाली म्हंटलं पाहिजे, स्वत: म्हणून काय उपयोग? असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. काका-पुतण्यातील या लढाईकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याअनुषंगाने अजित पवार हे प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. याच प्रचारादरम्यान त्यांनी आपणच बारामतीचा वाली असल्याचं मोठं विधान केलं आहे. 'समोरचे लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही भावनिक झालात तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. पुन्हा बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. शरद पवारांनी आपण दीड वर्षांनंतर पुन्हा उभं राहणार नसल्याचं सांगितलं आहे. ते निवडणूक लढवणार नाहीत. त्यानंतर तुमचे कोण पाहणार? कुणात तेवढी धमक आहे? कुणात तेवढी ताकद आहे याचा विचार करा,' असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. यावेळी शरद पवारांच्या कथित निवृत्तीवरूनही मतदारांना आपल्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
दरम्यान, या विधानानंतर शरद पवार यांनी यावर अजित पवारांना टोला लगावला आहे. आपण वाली आहे असं लोकांनी म्हंटलं पाहिजे. स्वत:च आपण वाली आहे असं म्हणून काही होत नाही, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.