माढाचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष व बबन शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. गुरूवारी रणजितसिंह शिंदे अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुतारी हाती घेण्यासाठी बबन शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ते शरद पवार यांची पुन्हा भेट देखील घेणार आहेत. याआधी देखील त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. काहीही झालं तरी महायुतीकडून उभं राहणार नाही, साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढवू असं बबन शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलता म्हंटलं आहे. त्यामुळे आता शरद पवार यावर काय भूमिका घेतात हे पाहाणं महत्वाचं ठरेल.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.