Navi Mumbai Drugs seized saam tv
Video

१३ कोटींचा हायड्रो गांजा पकडला; नवी मुंबईत धडक कारवाई, पुणे कनेक्शन, VIDEO

Navi Mumbai News : नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १३ कोटी ५० लाख रुपये किंमतीचा हायड्रो गांजा जप्त केला.

Nandkumar Joshi

विकास मिरगणे, नवी मुंबई, साम टीव्ही प्रतिनिधी

​नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ कोटी ५० लाख रुपये किंमतीचा १३ किलो 'हायड्रो गांजा' जप्त केला आहे. तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.​

​गुप्त माहितीच्या आधारे, वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. ​अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपी पुण्यातील आहेत, तर एक आरोपी उल्हासनगरचा आहे.​

जप्त करण्यात आलेल्या १३ किलो 'हायड्रो गांजा'ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे १३ कोटी ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ​आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT