nashik clash saam tv
Video

काही लोकांनी जाणीवपूर्वक दंगल घडवली, नाशिकच्या हिंसाचारावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया, VIDEO

Nashik Clash: नाशिक येथील काठे गल्ली येथील सातपीर दर्ग्याचे अतिक्रमण काढल्याने शहरात मोठ्या तणवाची परिस्थिति निर्माण झाली होती, या हिंसाचारात 21 पोलीस जखमी झाले असून सार्वजनिक मालमत्तेचे देखील नुकसान केले होते.

Omkar Sonawane

नाशिक येथील काठे गल्ली सिग्नल ते पखाल रोडवर बुधावर (दि.16) पाऊण वाजेच्या सुमारास जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत पोलिसांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत 21 पोलीस जखमी झाले आहेत. या दंगलीचे मविआ कनेक्शन समोर आले असून त्यातील काही आरोपींना अटक देखील केली आहे. तर काही अद्यापही फरार आहे.

यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्यात येईल असे पोलिसांना सांगितले होते. तसेच अतिक्रमण काढण्यास सुरुवात देखील झाली होती. मात्र, काही लोकांनी जाणीवपूर्वक विरोध करून दंगल घडवून आणली असा आरोप फडणवीस यांनी केला. जाणीवपूर्वक काही लोकांनी दंगा करत दगडफेक केली. दंगलीमधील सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

SCROLL FOR NEXT