मनमाड : युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत एफडी घोटाळा ताजा असताना याच बँकेत आता 'इन्शुरन्स' घोटाळा झाल्याचे समोर आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालीय. ज्या संदीप देशमुखने एफडी घोटाळा केला होता, त्यानेच बँकेत बँकेची सिस्टर कन्सर्न असलेल्या स्टार युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा काढणाऱ्या धारकांना गंडवलंय. इन्शुरन्सचे बनावट सर्टिफिकेट देऊन लाखों रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी मनमाड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलीय. या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप देशमुख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सध्या संदीप देशमुख हा एफडी घोटाळा प्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहे. अगोदर एफडी घोटाळा, त्यानंतर आता इन्शुरन्स घोटाळा पाहून युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत चाललंय तरी काय?, असा प्रश्न खातेदारांकडून उपस्थित केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.