Nashik Lok Sabha Election News Saam TV News
Video

Nashik Election: मोठी बातमी! महंत अनिकेत शास्त्री BJPकडून लोकसभा लढवणार? शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

Nashik Lok Sabha Election News: नाशिकमधून महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा दावा केला आहे.

Saam TV News

नाशिक : नाशिकच्या राजकारण नवा ट्वीस्ट आलाय. नाशिकमधून महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा दावा केला आहे. भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा महंत अनिकेत शास्त्री यांनी केला आहे. नाशिकच्या जागेवरुन महायुतीकडून नेमकं लढणार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भुजबळांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना नेमकी कुणाला नाशिकमधून उमेदवारी देईल, याकडे लक्ष लागलेलं आहे. अशातच भुजबळांच्या विश्वासू सहकाऱ्यानंही उमेदवारी अर्ज घेतल्यानं महायुतीत नाशिकमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता भाजपकडून नाशिकची निवडणूक लढवणार असल्याचा दावा महंत अनिकेत शास्त्री यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. अनिकेत शास्त्री यांनी सगळ्यात आधी साम टीव्हीशी एक्लक्लुझिव्ह बातचीत करत नेमकं काय म्हटलं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

SCROLL FOR NEXT