Nashik Ashok Kharat Networth News Saam Tv
Video

Ashok Kharat Networth : महाराष्ट्राच्या 'एपस्टिन'चं भलं मोठं जाळं; जाणून घ्या अशोक खरातची संपत्ती किती?

Nashik Ashok Kharat Networth News : नाशिकमध्ये अटक झालेल्या भोंदू ज्योतिषी ‘कॅप्टन’ खरातने अंकशास्त्राच्या नावाखाली तब्बल २०० कोटींची संपत्ती जमवल्याचा धक्कादायक खुलासा तपासात समोर आला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

नाशिकमधील अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. एका महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आता धक्कादायक खुलासे समोर येत असून न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान कॅप्टन खरातने गेल्या ५ वर्षांत अफाट संपत्ती जमा केल्याचे तपासात समोर येत आहे.

अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली खरातने राजकीय नेते, सेलिब्रिटी, खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकारी आपल्या प्रभावाखाली आणले. या प्रभावाचा वापर करून त्याने जवळपास २०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नाशिकमधील पाथर्डी परिसरात त्याची सुमारे १५० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ३० एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी आणि मीरगाव येथेही त्याची मोठी गुंतवणूक असून तिथे एक भव्य फार्महाऊस उभारण्यात आले आहे.

खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे १६ ऑगस्ट २०१० रोजी ईशानेश्वर मंदिर बांधले. या मंदिराची वर्षाला अंदाजे २ कोटी रुपये उलाढाल होते. खरातची मालमत्ता केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून तिचे जाळे राज्यभर पसरलेले दिसते. पाथर्डी आणि गौळाणे शिवारात त्याने आपल्या पत्नी आणि मुलींच्या नावे कोट्यवधींचे खरेदीखत केले आहे. ओझर विमानतळाजवळील जानोरी आणि दहावा मैल भागातही त्याची पाच कोटींहून अधिक किमतीची जमीन आहे. इतकेच नव्हे तर शिर्डी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या जागेवर त्याने शेतजमीन खरेदी केली असून तिची किंमतही करोडोच्या घरात आहे. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथेही आलिशान ऑफिस असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: डायबिटीज असतानाही नारळपाणी प्यावे का? उपाशी पोटी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Maharashtra News Live Update : गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार-खासदारांचे नियोजित दौरे रद्द, राजकीय वर्तुळात शोककळा

Gold Monetization Scheme 2026: कपाटातलं सोनं बनवा कमाईचं साधन; RBI च्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये मिळवा बंपर व्याज

Maharashtra Governmnet: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT