Nandurbar News Saam Tv
Video

Nandurbar News: गरोदर महिलेचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, धक्कादायक VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई: नंदुरबारमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याचा आरोप वेळोवेळी केला गेलाय, परंतु आता या संदर्भात एक व्हिडिओच समोर आलेला आहे. एका प्रसुती झालेल्या महिलेला चक्का पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली आहे. रूग्णालयात प्रसुती झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी पूलच नव्हता. त्यामुळे या महिलेला झोळी करून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला आहे. गमलीबाई किसान पावरा, असं या महिलेचं नाव आहे. मागच्या आठवड्यात प्रसुती कळा आल्यानंतर तिला अशाच पद्धतीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सुमारे सात किलोमीटर अंतराचा जीवघेणा प्रवास या गरोदर महिलेनं केलाय. त्यामुळे नंदुरबारमध्ये मुसळधार पावसात गर्भवती महिलेनं नदी पार केलीय. त्यामुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. नंदुरबारमधील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव केव्हा बदलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

Surya Grahan 2024: २ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या आयुष्यावर लागणार ग्रहण; 'या' राशींवर घोंगावणार संकट

SCROLL FOR NEXT