NANDURBAR MALIAAMBA VILLAGE STUDENTS RISK LIVES DAILY ON HANGING BAMBOO BRIDGE saam tv
Video

Nandurbar : झुलत्या पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, सरकार लक्ष देणार का? | VIDEO

Nandurbar students crossing dangerous hanging bridge : नंदूरबारमधील मालिआंबा येथील शेकडो विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी दररोज झुलत्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. विकासाचं इंजिन सुसाट असल्याचा दावा करणारं हे सरकार याकडं लक्ष देणार आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Nandkumar Joshi

सागर निकवाडे, नंदूरबार | साम टीव्ही

Nandurbar News : महाराष्ट्रात विकासाचा वेग बुलेट ट्रेनसारखा आहे असं छातीठोकपणे राजकारण्यांकडून सांगितलं जातंय. पण हा व्हिडिओ बघितला तर कुठंय विकास असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण लहान लहान मुलं जीव धोक्यात घालून झुलत्या पुलावरून शाळेची वाट धरताहेत. झुलत्या पुलावरून जाणाऱ्या या मुलांचा जीव टांगणीला आहे. पण विकासाच्या गप्पा मारणारे राजकारणी आणि राज्यकर्त्यांना याकडं लक्ष द्यायला वेळ नाही हे दुर्दैवंच म्हणावं लागेल.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मालिआंबा गावाजवळील हा झुलता पूल. गावाजवळून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर हा झुलता पूल. काही प्रकल्पांवर पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या प्रशासनाकडं या नदीवर पूल बांधण्यासाठी निधी नाही अशी सबब दिली जातेय. शेवटी गावकऱ्यांसमोर पर्याय नसल्यानं त्यांनी स्वतःच बांबू आणि दोरखंडाच्या साह्यानं नदीवर बांबूचा झुलता पूल तयार केला. याच झुलत्या पुलावरून जीव धोक्यात घालून गावकरी, शाळेत जाणारी लहान लहान मुलं प्रवास करतात.

एका ठिकाणी पूल बांधला आहे. पण दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल नसल्यानं नदीपात्रातील कमरेइतक्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रोज जवळपास चाळीसेक विद्यार्थी आणि अंगणवाडीतील शंभरहून अधिक बालक अशा पद्धतीने प्रवास करत आहेत. याकडं सरकार लक्ष देणार का, असा सवाल इथल्या ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

येण्या-जाण्यासाठी त्रास होतो म्हणून चार ते पाच वर्षांपूर्वी गावकऱ्यांनीच पूल बांधला. मतदानावेळी पुढाऱ्यांकडून फक्त आम्हाला पूल बांधून देण्याचं आश्वासन दिलं जातं. बाजारात जायला रस्ता नाही. दवाखान्यात एखाद्याला घेऊन जाताना त्रास होतो. बांबू आणि दोरी दरवर्षी बांधावी लागते. मोठ्या पुराच्या वेळी पूल वाहून जातो. आम्हाला पूल बांधून हवा आहे, अशी आमची मागणी आहे.
फुलवंती तडवी, ग्रामस्थ, मालिआंबा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT