Revenue department officials destroying boats used for illegal sand mining in the Godavari river at Nanded. Ai
Video

वाळू उपसण्यासाठी जिलेटीनचा वापर! रेती माफियांवर महसूल विभागाची सर्जिकल स्ट्राईक|VIDEO

Illegal Sand Mining Action In Nanded: नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाने मोठी कारवाई करत ३५ लाखांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला.

Omkar Sonawane

नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल विभागाने आज मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उपशावर कारवाई करत महसूल विभागाने तब्बल ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला आहे.

महसूल विभागाचे पथक गस्तीवर असताना त्रिकूट परिसरात अवैध रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी रेती उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी आणि साहित्य आढळून आले. कारवाईदरम्यान दोन बोटी मजुरांच्या मदतीने नदीत बुडवून टाकण्यात आल्या, तर एक मोठी बोट जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली.

या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाकडून पुढील कारवाईही सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT