हरियाणाच्या निकालावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात जुंपली आहे. अहंकारी रावणाप्रमाणे अहंकारी कॉंग्रेसचा पराभव झाला असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर अहंकार येत्या विधानसभेत दिसून येईल असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत बळ वाढलेलं दिसत आहे. दरम्यान, हरियाणा निकालानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मात्र चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं दिसत आहे. 'कॉंग्रेसला अहंकार नडला, अहंकारी रावणाप्रमाणे अहंकारी कॉंग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्रात देखील विकासनीतीच्या जोरावर महायुतीचाच विजय होईल.' अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसवर केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. 'राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यात यांचा अहंकार, कमिशनखोरी, भ्रष्टाचार समोर येईलच. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंत त्यांनी करावं.' असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.