ED seized ₹8 crore in cash and ₹23 crore in jewellery during a raid on VVMC officer YS Reddy’s homes in Vasai and Hyderabad, exposing a large-scale money laundering network.  Saam Tv
Video

निलंबित अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड; पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे|VIDEO

ED Raid On VVMC Deputy Town: नालासोपारा 41 इमारत घोटाळ्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या घरावर ईडीची छापेमारी. ८ कोटी रोकड, २३ कोटींचे दागिने जप्त करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

वसई विरार पालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारामधील 41 इमारतींशी संबंधित मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) 14 मे रोजी रेड्डी यांच्या वसई व हैदराबाद येथील निवासस्थानी छापेमारी केली होती. या कारवाईत २३ कोटी रुपयांचे हिरे, दागिने आणि ८ कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १३(१)(ब) आणि १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्याकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे झाली आहे.

ईडीच्या तपासात रेड्डी यांनी पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या घरातून सापडलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोकड यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.

वसई-विरार महापालिकेतील नगररचना विभागातील भ्रष्टाचाराचा हा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुढील तपास ईडी आणि ACB एकत्रितपणे करत असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT