Nagpur’s Manakapoor Flyover accident site where a school van collided head-on with a bus, leaving one student and the driver dead. Saam Tv
Video

Nagpur Accident: स्कूल व्हॅन आणि बसच्या अपघातात विद्यार्थिनी आणि चालक ठार, नागपुरातील घटना|VIDEO

Nagpur School Van And Bus Accident: नागपूरच्या मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल व्हॅन आणि बसची समोरासमोर धडक होऊन विद्यार्थिनी सानवी खोब्रागडे आणि व्हॅन चालक ऋतिक कनोजीया यांचा मृत्यू झाला.

Omkar Sonawane

नागपूरच्या मानकापूर उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. स्कूल व्हॅन आणि स्कूल बस यांची समोरासमोर धडक होऊन एका विद्यार्थिनीचा आणि चालकाचा मृत्यू झाला आहे, तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सानवी देवेंद्र खोब्रागडे (विद्यार्थिनी) आणि ऋतिक कनोजीया (व्हॅन चालक) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील भवन्स विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन मानकापूर उड्डाणपुलावरून जात असताना, समोरून नारायणा विद्यालयाची रिकामी बस वेगात येऊन धडकली. सध्या या उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू होती. धडकेत स्कूल व्हॅनचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. तातडीने जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सानवी आणि चालक ऋतिक यांना आयसीयूत ठेवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पालक संघटना संताप व्यक्त करीत आहेत. अनफिट बस आणि व्हॅन शहरात धावत असताना RTO प्रशासन झोपले आहे का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

SCROLL FOR NEXT