Independent candidate Kisan Gawade leaving his residence after talks with Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in Nagpur. Saam Tv
Video

कोंडून ठवलेल्या भाजपच्या 'त्या' उमेदवाराची तब्बल अडीच तासानंतर सुटका|VIDEO

Kisan Gawade AB Form Cancelled Controversy: नागपूर महापालिका निवडणुकीत हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपशी संबंधित उमेदवार किसन गावडे यांना घरात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Omkar Sonawane

राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आज हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 13 ड मधील किसन गावडे हे अपक्ष उमेदवार आहे. त्यांनी माघार घेऊ नये म्हणून त्यांना राहत्या घरात लोकांनी कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला होता.

किसन गावडे यांना प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला होता, मात्र त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला. त्यानंतर किसन गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण भाजपने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. भाजपच्या निर्देशानंतर किसन गावडे हे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघाले होते. मात्र अनेक नागरिकांनी त्यांना थेट विरोध केला आणि त्यांच्या दाराला थेट कुलूप लावत त्यांना त्यांच्याच घरात बंद केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर किसन गावडे यांनी माघार घेतली आणि त्यांची घरातून सुटका झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे; फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Saturday Horoscope : लाडक्या गणरायाला काजळ लावून नारळ अर्पण करावं; मेषसह ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

महायुती तुटली? शिंदेसेनेची भाजपविरोधात बंडखोरी

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात 546 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT