सरकार आल्यानंतर मविआ देखील महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणेल, त्यात महिलांना २ हजार रुपये महिना देण्यात येणार आहे. मविआच्या जाहीरनामा समितीकडून याबाबत निर्णय देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या योजनेबाबतचा ठराव मांडण्यात येणार आहे. ही रक्कम २ हजार ठेवायची की ३ हजार याबाबत मविआच्या घटक पक्षात मतमतांतर होतं. मात्र आता मविआच्या जाहीरनामा समितीने ही रक्कम २ हजार रुपये असावी असा निर्णय घेतला आहे. येत्या २ दिवसात मविआ आपला जाहीरनामा सादर करण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ता आली तर महायुती सरकारची चर्चेत असलेली लाडकी बहिण योजना आता मविआकडून देखील चालवण्यात येईल, असच सूत्रांच्या माहितीवरून दिसून येत आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.