Mumbai Air Pollution Saam Tv
Video

Mumbai pollution: मुंबईकरांनो मास्क वापरा; धुळवडीच्या रंगामुळे मुंबईचं प्रदुषण वाढलं, VIDEO

Holi Effects: संपूर्ण राज्यासह मुंबईमध्ये अतियशय जल्लोषाने होळी साजरी झाली. मात्र या धुळवडीच्या रंगामुळे मुंबईचे वायु प्रदूषण वाढल्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

Omkar Sonawane

होळी आणि धुळवडीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरली असून, शहराचा वायुप्रदूषण निर्देशांक (AQI) 125 वर पोहोचला आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

विशेषतः अंधेरी आणि देवनार परिसरातील हवा अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. तज्ञांच्या मते, रंगांचे कण, धूर आणि होळीच्या जळणामुळे हवेत घनकणांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, शक्यतो घराबाहेर कमी वेळ घालवावा आणि प्रदूषण टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT