Tension in Worli as Ambedkar Jayanti Saam Tv
Video

Mumbai: वरळीत आंबेडकर अनुयायी अन् पोलिस आमने-सामने, डीजे बंदीच्या विरोधात आक्रमक; पाहा VIDEO

Tension in Worli as Ambedkar Jayanti: वरळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान राडा झाला. पोलिसांनी डीजेला विरोध केल्यामुळे आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले आहेत.

Priya More

वरळीत नागरिक आणि पोलिस आमने-सामने आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला डीजे लावू न दिल्याने स्थानिक रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिक आक्रमक झाले असून पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमची जयंती आम्हाला पोलिस साजरी करून देत नाहीत. ते आम्हाला लाईट बंद करायला आणि डीजे बंद करायला लावत आहेत. प्रत्येक जयंतलीला बिल्डिंगखाली पोलिस तैनात केले जातात. आज आम्हाला जबरदस्ती डीजे बंद करायला लावले. पोलिस आमच्यावर सूड उगवत आहेत असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

आक्रमक झालेल्या भिमअनुयायाने सांगितले की, 'वर्षातून एकदा आमचा कार्यक्रम असतो. यंदा आम्ही मिरवणूक काढली. इतर वेळी सगळे उत्सव होतात पण आमच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. आमचे वर्षातून फक्त ३ कार्यक्रम असतात पण ते देखील करून दिले जात नाहीत. इतर समाजाच्या कार्यक्रमाला डीजे लावून दिले जातात पण आमच्या कार्यक्रमात डीजे लावून दिले जात नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, संजय राऊतांच मोठं वक्तव्य; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यात खड्ड्यावरून शिवसेना आक्रमक, शिंदे गट करणार खड्ड्यांचा पंचनामा

कमी झोप, जास्त साखर खाणे आणि सतत मोबाईल पाहणे; रोजच्या 'या' 10 सवयी मेंदू अन् स्मरणशक्तीसाठी ठरतात घातक

ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! KCC मधून मिळणार तब्बल ₹5 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT