CM Devendra Fadnavis News  Saam tv
Video

Mumbai: खरंच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार का? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगतिलं...

CM Devendra Fadnavis On Mumbai: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारवर टीका केली आहे. आता यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले.

Priya More

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा वारंवार आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. 'मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही,' असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी आगामी काळातील विकासाचा रोडमॅपही विधानसभेत मांडला. विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे राज्याच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल असा विचार कुणीही करु नये. कारण निवडणुका आल्या की अशा टीका होतातच, असा टोला मुंख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुंबई कालही महाराष्ट्राची होती. आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार आहे. आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानेच महाराष्ट्र चालत राहिल.' असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT