Mumbai-Pune Expressway Accident Saam Tv
Video

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

Truck Accident Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला. ३ मोठे ट्रक एक्स्प्रेस वेवर उलटले. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. ३ मालवाहतूक ट्रक एक्स्प्रेस वेवर उलटले. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मिसिंग लिंक रोड संपतो त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकला अपघात झाला आहे. ट्रकमधील सामान आणि पेंट सदृश्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीस अडथळा आला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक जोड रस्त्यावर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातामुळे केवळ एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आगे. या अपघातानंतर घटनास्थळावर पोलिस, बचाव पथक आणि मदत पथक दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT