Mumbai Prabhadevi News  AI Image
Video

Mumbai : प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळ १०१ झोपड्यांवर हातोडा, रेल्वेची धडक कारवाई; अनेक कुटुंब बेघर

Mumbai Prabhadevi News : मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरात पश्चिम रेल्वेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. १०१ बांधकामांवर कारवाई; ५० ते ६० वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांची पुनर्वसनाची मागणी.

Alisha Khedekar

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेल्या रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पश्चिम रेल्वेने आजपासून सुरू केली आहे. या ठिकाणी असलेल्या एकूण १०१ बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मात्र, या कारवाईमुळे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांचे संसार या ठिकाणी असून, कारवाईनंतर त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा शोधावी लागणार आहे. त्यामुळे घरे तोडण्यापूर्वी या कुटुंबांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी संत रोहिदास निवासी संघाने केली आहे.

दरम्यान, या अतिक्रमणांविरोधात रेल्वेने २०२२ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच सुनावणी आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित झोपड्या रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता या आदेशानुसार पश्चिम रेल्वेने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पुनर्वसनाच्या मागणीवर आता काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Toe Pain : पायाचा अंगठा सतत दुखतोय? दुर्लक्ष करू नका, असू शकते शरीरातील 'या' कमतरतेचे लक्षण

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील संशयित निदा खानच्या घटस्फोट प्रकरणाची आज सुनावणी

Sanjay Raut: नागपूरचे नाव बदलून दीक्षाभूमी करा! संजय राऊतांची मोठी मागणी

Health Tips : तुमचीही रात्री उशिरा जेवण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

High Court : हायकोर्टाचा मोठा निर्णय! आधार कार्ड जन्मतारखेचा अंतिम पुरावा नाही

SCROLL FOR NEXT