Manoj Jarange Patil  Saam Tv
Video

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या, पोलिसांची नोटीस धडकली, नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange summoned for inquiry on November 10 : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदान प्रकरणात त्यांना चौकशीसाठी १० नोव्हेंबर रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai police notice to Manoj Jarange in Azad Maidan case : मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात मार्च-एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासासंदर्भात ही नोटीस असून, जरांगे यांना १० नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटिशीनुसार, 'गुन्ह्याच्या तपासादरम्यान तुमच्याकडे विचारपूस करण्यासाठी सबळ व वाजवी कारणे असल्याने, तुम्ही १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तपासात सहकार्य करावे'. परवानगीशिवाय आंदोलन करणे, बेकायदा जमाव जमवणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा आरोपांखाली जरांगे यांच्यासह त्यांचे सहकारी वीरेंद्र पवार, पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले आणि प्रशांत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार आणि मनोज जरांगे पाटील चौकशीला सामोरे जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT