Mumbai News Saam Tv
Video

Mumbai News: 2040 पर्यंत आपली मुंबई बुडणार, 10 टक्क्यांहून जास्त जमीन पाण्याखाली जाणार?

मुंबईकरांनो सावध व्हा...7 बेटांपासून तयार झालेली मायानगरी पुढच्या 15 वर्षात पाण्याखाली जाण्याची शक्याताय. हा दावा एका रिसर्च फर्मनं केलाय...या दाव्यात नेमकं काय म्हणण्यात आलंय.

Tanmay Tillu

स्वप्ननगरी,मायानगरी, बॉलिवूडची मुंबई, श्रीमंतांची झगमगती आणि त्याचवेळी गरीबांनाही कधी उपाशी न ठेवणारी, सतत धावणारी आपली मुंबई... मात्र हीच तुमची आमची मुंबई पाण्याखाली जाणार आणि तेही पुढच्या 15 ते 20 वर्षात असं तुम्हाला सांगितलं तर ? ऐकून धक्का बसला ना ? मात्र हे आम्ही म्हणत नसून हा दावा केलाय बंगळुरत स्थित एका थिंक टँकनं. बंगळुरुच्या CSTEP म्हणजेच सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी’ या संस्थेनं हा धक्कादायक अहवाल दिलाय.

हवामान बदलामुळे समुद्राची पाणीपातळी वाढत असल्यामुळे 2040 पर्यंत मुंबईतील 10 टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. भारतातील किनारपट्टीवरील शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका असल्याचा इशारा संस्थेनं दिलाय. मुंबईला याचा सर्वाधिक धोका आहे.

मुंबई पाण्याखाली जाणार?

  • 21व्या शतकाअखेरपर्यंत मुंबई पाण्याखाली?

  • किनारपट्टीवरील 15 शहरांमध्ये समुद्रपातळी वाढण्याची शक्यता.

  • समुद्रपातळी वाढण्याचा सर्वाधिक धोका मुंबईला.

  • 2100 सालापर्यंत मुंबईची पाणीपातळी 76.2 सेमीपर्यंत वाढण्याची भीती.

  • मुंबईच्या तुलनेत मंगळुरू, हल्दिया, थुथ्थुकुडीमध्ये जमीन पाण्याखाली जाण्याचं प्रमाण अधिक.

  • कृषी, जंगल, आरोग्य क्षेत्रावर मोठा परिणाम.

ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. वेळी अवेळ पाऊस, सातत्यानं वाढणारं तापमान अशा प्रकारच्या घटना संपूर्ण जगभरात घडतायत. त्यामुळे समुद्राच्या पाणीपातळीतदेखील वाढ होत असल्याचं बंगळुरुतील संस्थेनं म्हटलंय. संस्थेनं प्रमुख शहरात गेल्या 34 वर्षांत पाण्याची पातळी किती वाढली याचाही अभ्यास केलाय.

34 वर्षांत वाढलेली पाणी पातळी

  • मुंबई 4.4 सेमी

  • हल्दिया 2.72 सेमी

  • विशाखापट्टणम 2.38 सेमी

  • कोची 2.21 सेमी

  • पारादीप 0.71 सेमी

  • चेन्नई .68 सेमी

2100 सालापर्यंत पाणी किती वाढणार?

मुंबई 76.2 सेमी

पणजी 75.5 सेमी

उडपी 75.3 सेमी

मंगळुरू 75.2 सेमी

कोझिकोड 75.1 सेमी

कोची 74.9 सेमी

तिरुअनंतपुरम 74.7 सेमी

कन्याकुमारी 74.7 सेमी

मुंबई कोणाची असं म्हणत मुंबईवरुन बरंच राजकारण रंगतं...मात्र हीच मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे..त्यामुळे आपल्या मुंबईला वाचवायचं असेल तर ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांवर लक्ष देऊन युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT