Mumbai Monorail Saam TV
Video

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Wadala to Pratiksha Nagar Monorail Service : मुंबईत मोनो रेल तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडीच तासांपासून ठप्प झाली होती. या अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शेकडो प्रवासी मोनो रेल स्थानकांवर अडकले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील मेट्रोसेवा विस्कळीत झाल्यानंतर मोनो रेलसेवा देखील सकाळपासून ठप्प झाली होती. वडाळा ते प्रतीक्षानगर मोनो रेल स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक तब्बल अडीच तासांपासून ठप्प झाली होती. या अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शेकडो प्रवासी मोनो रेल स्थानकांवर अडकले होते. अनेकजण वेळेत ऑफिसला पोहोचू शकले नाहीत. तर काहींनी पर्यायी वाहतुकीचा वापर करत ऑफिस गाठले.

तसंच घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही वेळात दुरुस्तीचे काम पूर्ण झाले पण अद्यापही मेट्रोसेवा उशिराने सुरू आहे. मोनोरेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असून काही वेळातच दुरूस्तीचे काम पूर्ण होऊन मोनो रेल सेवा सुरळीत होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT