Marathi School Saam TV
Video

Marathi School : मुंबईत मराठी शाळांची दैना, 6 वर्षांत 39 शाळा बंद | VIDEO

Mumbai School : मुंबई शहरातील पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढतो आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी शून्यावर पोहोचल्यामुळे मराठी शाळा बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई शहरात पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे झुकत चालल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या झपाट्याने घटत आहे. मागील ६ वर्षांत मुंबईतील तब्बल ३९ मराठी माध्यम शाळा बंद करण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, मराठी माध्यमातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी शून्यावर पोहोचल्यामुळे त्या शाळा बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले की, वाढती शहरीकरणाची झपाटी, इंग्रजी शिक्षणाची मागणी, आणि पालकांची बदलती मानसिकता यामुळे मराठी माध्यमातील शाळा अडचणीत येत आहेत.मराठी शिक्षण वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र वास्तव पाहता मराठी शाळांसमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

SCROLL FOR NEXT