Harbor Line Local Train Latest News Saam TYV
Video

Mumbai Local Train : मुंबईची लाईफलाईन पुन्हा खोळंबली, लोकल ट्रेन अचानक ठप्प; प्रवासी ताटकळले

Harbor Line Local Train Latest News : हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवेवर परिणाम झाला आहे.

Satish Daud

मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून पनवेलकडे आणि पनवेल येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत.

परिणामी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून रेल्वेस्थानकावर गर्दी होत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा ठप्प राहणार असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील सीबीडी बेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन ठप्प झाल्या आहेत. दरम्यान, पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक अजूनही ठप्पच असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा टीमची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा मिळवला जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT