Lalbaugcha Raja Darshan Video Saam TV
Video

Lalbaugcha Raja Darshan : व्हीआयपींना निवांत दर्शन, सर्वसामान्यांना मानगुटी धरून फेकलं; लालबागचा नवा VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja Darshan : लालबागमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये व्हीआयपींना निवांत दर्शन आणि सर्वसामान्यांच्या मानगुटी धरून फेकलं जात असल्याचं समोर आलंय.

Satish Daud

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे. खासकरून मुंबईच्या लालबाग-परळ या भागात गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह आणि लगबग दिसून येते आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी राज्यभरातून अनेक लोक येत असतात. बाप्पााच्या दर्शनासाठी भाविक लांबच लांब रांगा लावतात. दर्शनसाठी व्हिआयपी आणि सर्वसामान्यांच्या दोन रांगा असतात.

अगदी काल परवाच लालबाग राजाच्या मंदिरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत व्हिआयपींना निवांत दर्शन आणि सर्वसामान्यांची फरफट होत असल्याचं दिसून आलं होतं. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या. हा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत व्हीआयपींना निवांत दर्शन आणि सर्वसामान्यांच्या मानगुटी धरून फेकलं जात असल्याचं समोर आलंय. व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले असून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. लालबागच्या राजाचं दर्शन व्हावे यासाठी दूरवरून आलेल्या भाविकांसोबत गणपती मंडळाच्या सदस्यांनी केलेलं असं वर्तन चुकीचं आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT