Crime News Saam tv
Video

Mumbai Crime : कुर्ल्यात गोळीबाराचा थरार, गुंड बाबा याच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या

Kurla Crime News : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात एका गुंडावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘बाबा’ नावाच्या गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

Namdeo Kumbhar

Kurla firing incident : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेकडील माकडवाला कंपाऊंडमध्ये जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका गुंडावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'बाबा' नावाच्या एका स्थानिक गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. जुन्या गोळीबाराच्या घटनेचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या हल्ल्यात बाबा हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच व्ही.बी. नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी गुंडाला उपचारासाठी तातडीने कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : विधीमंडळातील फुटीचे पडसाद मूळ पक्षात का उमटू शकत नाहीत?; न्यायमूर्ती बागचींच्या प्रश्नाने कोर्टात पुन्हा वाद पेटला

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT