Kurla assault news Saam TV
Video

Mumbai : भयंकर घटना, ४० फेरीवाल्यांनी तरूणाला बेदम मारलं, कारण वाचून तुम्हालाही येईल राग

Kurla assault news : मुंबईतील कुर्ला परिसरात ३० ते ४० फेरीवाल्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

कुर्ल्यात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळाली. 30 ते 40 फेरीवाल्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय. क्षुल्लक वादातून ही हाणामारी करण्यात आलीय. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे मारहाणीचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता पोलीस आणि महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय.

कुर्ल्यात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली. 30 ते 40 फेरीवाल्यांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

सध्या रमजान ईदच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कुर्ल्यात फेरीवाल्यांकडून अनधिकृत धंदे लावण्यात येत आहेत. अशातच चालण्यावरून जागा होत नसल्याने कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील आकाश टॉकीज परिसरात मारहाणीची घटना घडली. जखमी तरुणावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह तयार झालेय. पोलिस आणि पालिका यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT