Kurla BEST Bus Accident Update Saam Tv
Video

BEST Accident : कुर्ला बस अपघात प्रकरणात मानवाधिकार आयोगाची एन्ट्री

Mumbai Kurla BEST Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी वकिलाने मानवाधिकार आयोगात धाव घेतली आहे.

Namdeo Kumbhar

कुर्ला बेस्ट बस अपघातात ७ जणांचा जीव गेला. या अपघातात ४८ जण जखमी झाले. बस चालक संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना बसचे स्टेरिंग प्रशासनाने त्याच्या हाती दिले. या अपघात प्रकरणे न्यायालयाने मोरेला पोलीस कोठडी सुनावली. आता या प्रकरणात मुंबईतील दोन वकिलांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाच्या पॅनलकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मानवाधिकार आयोगाची एन्ट्री झालेली आहे.

बेस्टच्या कंत्राटी चालकांकडून मर्यादेपेक्षा अधिक तास काम करुन घेतलं जात आहे, अशा आशयाची तक्रार राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल झालेली आहे. कुर्ला अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीदेखील करण्यात आलेली आहे.बेस्ट प्रशासनाकडून चालकांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. ते अतिशय भीषण परिस्थितीत काम करतात, असं राय आणि मिश्रा यांनी आयोगाला दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT