Mumbai Airport Accident SaamTv
Video

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर कारचा विचित्र अपघात, पाच जण जखमी | Video

Mumbai International Airport Accident : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथील पार्किंगमध्ये आज एक अपघात झाला आहे. कारने दिलेल्या धडकेत इतर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाच जण जखमी झाले आहे.

Saam Tv

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ येथील पार्किंगमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात एका कारने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. पॅसेजर सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडिज गाडीवरील चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान अपघातानंतर CSMIAच्या प्रवक्त्याने अपघाताबाबत माहिती दिलीय. आज सकाळी CSMIA येथे, T2 च्या डिपार्चर लेनमध्ये कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पाच जण जखमी झाले. विमानतळ वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीएसएमआयए आणि पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि ऑपरेशन्स चालू ठेवण्यासाठी काम करत आहे."

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ येथे रविवारी दुपारच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आहे. पार्किंगमध्ये एका मर्सिडिज कारने इतर अनेक गाड्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. प्रवाशाला सोडण्यासाठी ही गाडी येथे आली होती. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने पार्किंगमध्ये असलेल्या इतर गाड्यांना धडक दिली. यात ५ जणं जखमी झाले आहे. जखमींमध्ये २ झेट रिपब्लिक देशाच्या दोघांचा समावेश, तर ३ जणं विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT