Fever Wave in Mumbai Saam TV
Video

Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या, मुंबई तापाने फणफणली | VIDEO

Fever Wave in Mumbai: सततच्या पावसानंतर आता मुंबईत उकाड्याने कहर केला आहे. तापमान ३४ अंशांच्या आसपास पोहोचल्याने नागरिक त्रस्त झालेत.उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी डॉक्टरांनी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत सलग काही दिवस पडलेल्या पावसाला सध्या विश्रांती मिळाल्याने शहरात उकाड्याने पुन्हा डोकं वर काढलं आहे. हवामानातील अचानक बदलामुळे मुंबईकर त्रस्त झाले असून, उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र जाणवू लागला आहे. सध्या मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे, तर आद्रता टक्केवारीही वाढली आहे, ज्यामुळे अंगातून घामाचा धाराच सुरू आहे.

मुंबईसारख्या सागरी किनाऱ्यावरील शहरामध्ये दमट हवामानामुळे उकाडा अधिक असह्य होतो. अशा परिस्थितीत उष्माघात ,डिहायड्रेशन ,अशक्तपणा, चक्कर येणे, ताप आणि खोकला अशा लक्षणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी डॉक्टरांनी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हाथ स्वच्छ धुणे, पुरेशी झोप घेणे आणि पोषक आहार घेणे.तसेच सहव्याधी असणाऱ्यांनी घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे जावे.

शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचं प्रमाण जरी पूर्ववत असलं, तरी अनेक ठिकाणी नागरिक तोंडाला रूमाल बांधून किंवा मास्क लावून फिरत आहेत, टोपी घालून किंवा छत्री घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहेत. मुंबईकरांनी सध्या परिस्थितीची गंभीरता ओळखून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या या टोकाच्या चढ-उतारांमध्ये आरोग्याची काळजी घेण ही गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

Asia Cup 2025: टीम इंडियातील किती खेळाडूंचे लग्न झाले तर किती अविवाहित?

Manoj Jarange: गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मुंबईत मनोज जरांगे गरजले

SCROLL FOR NEXT