Mumbai Goa Highway Work Gets New Deadline saam tv
Video

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Mumbai - Goa Highway Work : मुंबई- गोवा महामार्गाचं काम गेल्या दशकभरापासून रखडलेलं आहे. दरवर्षी नवी डेडलाइन देण्यात येते. आता पुन्हा नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ पूर्वी हे काम पूर्ण होईल, असं नितीन गडकरींनी लोकसभेत सांगितलंय.

Nandkumar Joshi

मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गडकरींनी ही नवीन डेडलाईन जाहीर केली.

सावंत यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मुंबई- गोवा महामार्गासाठी 'चांद्रयान मोहिमेपेक्षा जास्त खर्च झाला आहे, तरीही काम अपूर्ण का?' तुम्ही यात जातीनं लक्ष घाला. तरच काहीतरी होईल. दहा वर्षांपासून खूपच बिकट परिस्थिती आहे, असं सावंत म्हणाले. त्यावर नितीन गडकरींनी उत्तर दिले. हे काम २००९ मध्ये सुरू झाले. मी २०१४ मध्ये मंत्री झालो. जमीन संपादनाचा प्रश्न होता. आतापर्यंत खूप कंत्राटदार बदलले गेले. खूप कारवाया देखील करण्यात आल्या. या मार्गाचे ८९ टक्के काम पूर्ण झाले असून, कंत्राटदारांच्या अडचणींमुळे उशीर झाला. मात्र, एप्रिल २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल. खूप विलंब झाला हे मान्य करतो, असे गडकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली समाधानची राणी, लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर

Maharashtra Live News Update : कल्याण ग्रामीण पट्ट्यातील गावात बिबट्याचे दर्शन

सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध निर्माता काळाच्या पडद्याआड

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

SCROLL FOR NEXT