Traffic Jam On Mumbai-Goa High Way Saam Tv
Video

VIDEO: मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, ३ तासांच्या प्रवासाठी १२ तास; प्रवाशांचे हाल

Traffic Jam On Mumbai -Goa Highway: मुंबई -गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागोठणे, सुकेळी, इंदारपुर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Priya More

मुंबईमध्ये राहणारे चाकरमानी कोकणामध्ये आपल्या गावी गणेशोत्सवासाठी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. नागोठणे, सुकेळी, इंदारपुर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतुक कोंडीमध्ये एसटी आणि खासगी बसेस अडकल्या आहेत. मुंबईतुन माणगाव हे ३ तासांचे अंतर पार करण्यासाठी १२ तास लागत आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या प्रवासात वृद्ध, लहान मुलं आणि महिलांचे मोठ्या प्रमाणत हाल होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे ते लाखपाले दरम्यान अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेण तालुक्यातील कासू, गडब परिसरात देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गाड्या एकचा ठिकाणी अडकून राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. तसंच प्रदूषणाचा देखील प्रवाशांना त्रास होताना दिसत आहे.

अशातच गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्याने कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकण रेल्वेमार्गावर काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावत आहेत. तर नियमित धावणाऱ्या गाड्या दीड तास उशिराने धावत आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा वाहतूक खोळंबा झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी ३१० जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कोकणकन्या , तुतारी , सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्स्प्रेस गाड्या उशीराने धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

SCROLL FOR NEXT