Long queues of vehicles on the Mumbai-Goa Highway near Mangaon as festive travelers head to Konkan for Diwali celebrations. Saam Tv
Video

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Heavy Traffic Jam On Mumbai-Goa Highway: दिवाळी आणि सलग सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर विशेषतः माणगाव परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

दिवाळी आणि सलग सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर विशेषतः माणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोकणगावाकडे जाणाऱ्या लेनवर ही कोंडी अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहनं रेंगाळत पुढे सरकत आहेत. महामार्गावरील वाढलेला ताण लक्षात घेऊन पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोकणात दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील हा ताण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे ते दीपाली सय्यद 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोण कोण झळकणार? भाऊच्या धक्क्यासाठी रितेश देशमुख सज्ज

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २०२६ मध्ये खरंच पगार वाढणार का? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

Maharashtra Live News Update: पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांचे निधन

SCROLL FOR NEXT